दुती चंदला सुवर्णपदक

नापोली – भारताच्या दुती चंदने जागतिक आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेतील शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. 23 वर्षीय खेळाडू दुती हिने हे अंतर 11.32 सेकंदात पार केले. या स्पर्धेतील 100 मीटर्स धावण्यात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.

दुतीला स्वित्झर्लंडच्या डेल पॉन्टे हिचे आव्हान होते. तिने प्रारंभापासून वेगाचे सातत्य दाखवित पॉन्टेवर विजय मिळविला. पॉन्टे ने 11.33 सेकंदात ही शर्यत पार करीत रौप्यपदक मिळविले. जर्मनीच्या लिसा क्वाये हिला ब्रॉंझपदक मिळाले. तिने हे अंतर 11.39 सेकंदात पूर्ण केले. दुतीने एप्रिलमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत 11.26 सेकंद वेळ नोंदवित या मोसमातील सर्वोत्तम वेळ नोंदविली होती. दुती ही भुवनेश्‍वर येथील कलिना औद्योगिक तंत्रनिकेतन संस्थेत शिकत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here