देवराम गायकवाड यांचा उपक्रम : शालेय परिसरात वृक्षारोपण
वडगाव मावळ – कांब्रे (नाणे मावळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना उद्योजक देवराम गायकवाड यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या संगणकाचे उद्घाटन केंद्र प्रमुख युनूस मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापिका रुक्मिणी देवडकर, शिक्षक कविता दंडवते, अंजनी जंगम, हिराबाई गोडे, मेघा जंगम, माधव गुरव, हनुमंत बनकर, केंद्र प्रमुख युनुस मुलाणी, गणेश मुंढे तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. देवराम गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते फळ व वनौषधी वृक्षांच्या रोपांचे रोपण करण्यात आले.