वंचित आघाडीत बिघाडी

लक्ष्मण मानेंचे बंड ः प्रकाश आंबेडकरसह पडळकरांवर साधला निशाणा

मुंबई – लोकसभा निवडणुकीत मोठ्या जोमाने उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीत निवडणुकीनंतर बिघाडी झाली आहे. संघटनेतील पदाधिकारी असलेले लक्ष्मण माने यांनी बंड पुकारले आहे. त्याचबरोबर वंचित आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका वंचित आघाडीला बसू शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपाच्या लोकांना सामावून घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला याचा थेट फायदा झाला आहे. आघाडी ही आता बहुजनांची राहिली नसून उच्चवर्णीयांची झाली आहे, अशा शब्दांत लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव घेत टीका केली. तर या टिकेला उत्तर देताना पडळकर यांनी माने हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हस्तक असल्याचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)