जम्मू-काश्मीर – जम्मू काश्मीर येथील अनंतनाग येथे आज सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला असून या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ५ जवान शाहिद झाले आहेत. या हल्ल्यामध्ये अनंतनागचे SHO देखील गंभीर रित्या जखमी झाले आहेत. हाती आलेल्या वृत्तानुसार अनंतनाग येथील केपी मार्गावर बस स्थानका शेजार सीआरपीएफच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हा भ्याड दहशतवादी हल्ला केला आहे.
सीआरपीएफ व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून आतापर्यंत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे
https://twitter.com/ANI/status/1138782918837448704.