नॉटिंगहॅम – सतारीची मैफल रंगत असतानाच तार तुटावी आणि मैफिलीचा बेरंग व्हावा असेच भारताचा सलामीवीर शिखर धवन याच्याबाबत घडले आहे. हुकमी सलामीवीर म्हणून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सुरुवातीच्या अपयशानंतर त्याला सूर सापड्ला नाही तोच त्याच्या डाव्या हातास फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले असून आणखी किमान दोन सामने त्याचा सहभाग अनिश्चित झाला आहे. त्यामुळं धवन ऐवजी कोणाला संधी मिळावी, याची चर्चा सध्या रंगली आहे. असे सगळे असताना, आता सलामीवीर शिखर धवन लवकरच फिट होऊन पुनरागमन करणार असल्याची वार्ता आली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याआधी झालेल्या मुलाखतीत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आले होते, त्यावेळी त्यांनी ही बातमी दिली आहे.
Team India batting Coach Sanjay Bangar: We're monitoring Shikhar Dhawan. He may take 10-12 days to recover, we'll assist him. Vijay Shankar is one of the options, if&when required. It's good to have back up. Rishabh Pant will be in Manchester. pic.twitter.com/u4LUGsTGin
— ANI (@ANI) June 12, 2019
यावेळी बांगर यांनी सांगितले की ,” आम्ही धवनच्या दुखापतीकडे लक्ष ठेवून आहोत. धवनच्या दुखापत लवकर बरी होईल, अशी आम्हाला आशा आहे. धवन 10-12 दिवसांमध्ये तंदुरस्त होईल, असे आम्हाला वाटते. गरज भासली तर आमच्याकडे विजय शंकरचा पर्याय आहे . तसेच रिषभ पंत देखील उपलब्ध असून तो मँचेस्टर येथे काही वेळात दाखल होणार आहे.” यामुळे क्रीडाप्रेमींच्या आशा उंचावल्या आहेत.
#WATCH Shikhar Dhawan at India's practice session at Trent Bridge, Nottingham ahead of their #ICCCricketWorldCup2019 match against New Zealand, tomorrow. He had suffered a fracture on his thumb in India's match against Australia on 9 June & has been ruled out for at least a week. pic.twitter.com/4PjV3dvH6j
— ANI (@ANI) June 12, 2019
गुरुवारी भारतीय संघाचा सामना ट्रेटं ब्रिजमध्ये न्युझीलंड विरोधात होणार आहे. या लढतीपूर्वी भारतीय संघाने कसून सराव केला. या सामन्यात धवन खेळू शकणार नाही आहे. असे असले तरी, सरावासाठी धवन इतर खेळाडूंसोबत मैदानात दिसला. शिखरने सराव केला नसला तरी प्रशिक्षकांनी दिलेल्या संकेतामुळे तो लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसेल अशी आशा आहे. त्यामुळं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात धवन खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.