पिंपरी -वडिलोपार्जित संपत्ती विकून त्यातून येणाऱ्या पैशांमध्ये हिस्सा मिळावा, यासाठी मुलाने व सुनेने मिळून आई – वडिलांना मारहाण केली. प्रसाद विलास अवघडे व प्रियांका प्रसाद अवघडे असे आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या आरोपी मुलगा व सुनेचे नाव आहे. या प्रकरणी आई मीना विलास अवघडे (वय 60, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सोमवारी रात्री मुलगा आणि सून आई-वडिलांच्या थेरगाव येथील घरात जबरदस्तीने घुसले व वडील विलास अवघडे यांच्याकडे पुनावळे व कोल्हापूर येथील संपत्ती विकण्याची मागणी केली. संपत्ती विकून येणाऱ्या पैशात हिस्सा देण्यासाठी धमकावले. त्यासाठी विलास अवघडे व मीना अवघडे यांनी नकार दिला असता मुलगा व सुनेने त्यांना मारहाण केली.