चिखलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी -“लग्नाला हो म्हण अन्यथा तुझ्या भावांना मारून टाकेन’, अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकऱणी 17 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली असून प्रथमेश वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतत फिर्यादी मुलीचा पाठलाग करत होता व तिने लग्नाला होकार द्यावा यासाठी जबरदस्ती करत होता. बुधवारी (दि.24) ती घरा समोरील रोडवर थांबली असताना आरोपीने तिचा हात पकडला व पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नाला होकार दिला नाही तर तुझ्या भावांना मारुन टाकेन अशी धमकी दिली व तिचा हात पडकून विनयभंग केला.

यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून विनयभंगाच्या प्रकारात वाढ झाली आहे. वारंवार घडणारे प्रकार थांबविण्यासाठी कडक उपाय योजना गरज व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)