पुणे – अस्वच्छतेविरुद्ध कारवाईला आणखी जोर

दिवसभरात 863 जणांवर कारवाई; दीड लाखांची वसुली

पुणे – शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर पालिकेकडून करण्यात येणारी कारवाई गेल्या दोन महिन्यांत लोकसभा निवडणुकीमुळे थंडावली होती. मात्र, प्रशासनाने पुन्हा या कारवाईला सुरूवात केली असून शुक्रवारी दिवसभरात तब्बल 863 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल 1 लाख 59 हजार 841 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महापालिकेकडून अशा प्रकारची कारवाई सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी एवढया मोठया प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. शहरात स्वच्छ अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नोव्हेंबर 2018 पासून शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. त्यात प्रमुख्याने रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे तसेच लघुशंका आणि शौचालयास बसणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई केली जात आहे. ही मोहीम निवडणुकीमुळे थंडावली होती. मात्र, आता प्रशासनाने पुन्हा ती तीव्र केली असून सर्व आरोग्य निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत शुक्रवारी दिवसभरात 863 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यात रस्त्यावर थुंकणाऱ्या 53 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 6 हजार 849 रुपयांचा, तर अस्वच्छता करणाऱ्या 747 जणांकडून 1 लाख 21 हजार 340 रुपयांचा, पानपट्टीच्या आवारात थुंकण्यासाठी डस्टबीन ठेवणाऱ्या 62 पानपट्टी चालकांकडून सुमारे 6,670 रुपयांचा तर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद असलेल्या सोसायटीकडून सुमारे 25 हजार रुपयांचा असा 1 लाख 59 हजार 841 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.