दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेला लुटले

पिंपरी – दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेचे 62 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र लंपास केले. रविवारी (दि.14) रात्री साडे अकाराच्या सुमारास बावधन परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी एका 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला या रविवारी रात्री बावधन येथील सुमती हाईट्‌स सोसायटीसमोरून पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील 62 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. सहायक पोलीस निरीक्षक आनंद पगारे अधिक तपास करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here