विनयभंग करणाऱ्याला युवकाला सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा

पाथर्डीतील हनुमान टाकळी येथील मे महिन्यातील घटना

नगर – विनयभंग करणाऱ्याला जिल्हा न्यायालयाने एक वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अमोल बबन बांदल (वय 28, रा. हनुमान टाकळी, ता. पाथर्डी) असे शिक्षा ठोठावलेल्या युवकाचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. सरकारी अभियोक्ता ऍड. मोहन कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाथर्डीतील हनुमान टाकळी येथे रात्री हा प्रकार घडला होता. पीडिता ही आपल्या आई आणि आजीसोबत झोपली होती. अमोल बांदल हा पहाटे तिथे पोहचला. पीडिताच्या अंगावर कपडे बाजूला केले. त्यावेळी पीडिताला जाग आली. अमोल याने यावर पीडिताशी लज्जास्पद वर्तन केले. गप्प बस आरेडू नकोस नाहीतर बेत करीन अशी धमकी दिली. परंतु पीडिताने आरडाओरडा केला. यामुळे घरातील लोक जागे झाले. अमोल बांदल याला पकडून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पाथर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

जिल्हा न्यायाधीश नावंदर यांच्यासमोर हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ऍड. मोहन कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. पीडिता आणि तिचा भाऊ यांची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी अमोल बांदल याला शिक्षा ठोठावली. आमोल बांदल याला 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडापैकी दहा हजार रुपये पीडिताला नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)