कुदळवाडी येथे दोन दुकानात चोरी

पिंपरी  – कुदळवाडी येथे एका कपड्याच्या व मोबाईलच्या दुकानात चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून कपडे, मोबाईल फोन व लॅपटॉप चोरून नेले आहेत. तुषार पोपट घिगे (वय-24 रा. मोशी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुदळवाडी येथे कपड्याचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील कपडे चोरून नेले तसेच त्याच्या शेजारी असणाऱ्या जय मल्हार मोबाईल शॉपी आहे. चोरट्यांनी दुकानातील पाच मोबाईल व लॅपटॉप असा एकूण 14 हजार 670 रुपये किंमतीचा माल चोरीला गेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.