मोहिते यांच्यावर गुन्हे दाखल; राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

माजी आमदार मोहिते यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचा निषेध : कारवाईमागे सूडभावनेचा आरोप

शिंदे वासुली – चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा संघाच्या वतीने 30 जुलै 2018 रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात सुमारे कितीतरी कोटी रुपये शासन व वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. यावेळी झालेल्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी असताना केवळ माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना जबाबदार धरून त्यांचेवर कुभांड रचून खोटे गुन्हे व अटकेची कारवाई करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करण्यासाठी वासुली फाटा येथे सकल मराठा व राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला होता.

माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना सूडभावनेने पोलीस प्रशासन, तालुक्‍याचे आमदार सुरेश गोरे व महाराष्ट्र शासन यांनी चालू केलेली कारवाई यांचा निषेध करण्यासाठी पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व नागरिकांनी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. माजी आमदारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा पिंपरी-पाईट गटातील सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास लिंभोरे पाटील यांनी इशारा दिला.

यावेळी तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे पाटील, उपाध्यक्ष हनुमंत दळवी, पश्‍चिम विभाग अध्यक्ष अमोल पानमंद, पिंपरी-पाईट गट अध्यक्ष कांताराम पानमंद, विद्यार्थी सेल अध्यक्ष निलेश काळे, माजी सरपंच रामदास राऊत, कैलास पडवळ, निवृत्ती नवले, संदिप बधाले, बाळासाहेब लिंभोरे, अमोल पाचपुते, बाळासाहेब कलवडे, सुरेश घनवट, काळूराम मिंडे, दत्तात्रय देशमुख, सुरेश पडवळ, प्रदीप पवार, शरद वाडेकर, गुलाब शिवेकर, राजाराम पानमंद, भरत सांडभोर, सतिश पवार, सुरेश गायकवाड, मारुती मेंगळे, गणेश पानमंद, पोपट मेंगळे, विकास भेगडे, सागर पाचपुते, माऊली शिंदे, विकास सुतार, दत्तात्रय पडवळ आदि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमंत दळवी, अमोल पानमंद, निलेश काळे व कैलास लिंभोरे पाटील यांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचेवर करण्यात येत असलेल्या सुडात्मक राजकारणाचा निषेध करुन गुन्हे मागे घेतल्याचे आवाहन केले. निषेध मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा, एक लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या.

खेड राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्णपणे भांबवलेल्या अवस्थेत आहे. त्यांना काय करावं हे सुचत नसल्याने उठसूट माझ्यावर आरोप करताहेत. मी यापूर्वी ही स्पष्ट केले होते किंवा या प्रकरणात माझा काडीमात्र संबंध नाही. विरोध निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच माझ्या प्रचाराला लागलेली दिसतेय.
– सुरेश गोरे, आमदार खेड


मराठा क्रांती मोर्चात सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होते. मग माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनाच जबाबदार धरून पोलिसांनी कारवाई का केली? ती पण एक वर्षानंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर कशी? हे सगळे युती सरकार व तालुका प्रतिनिधींचे राजकीय षड्‌यंत्र आहे.
– कैलास लिंभोरे, अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस


निवडणुकीत आपला पराजय होण्याच्या भीतीपोटी काही लोकांनी षड्‌यंत्र करुन दिलीप अण्णाला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे. या घटनेचा पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत.
-अमोल पानमंद, पश्‍चिम विभाग अध्यक्ष


अण्णांवर झालेल्या कारवाईचा निषेध करतो. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे ताबडतोब मागे घेऊन सूडभावनेचे राजकारण थांबवावे.
– हनुमंत दळवी, उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)