पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट : केडन्सच्या पहिल्या डावात 224 धावा

शुभम तैस्वालची भेदक गोलंदाजी : व्हेरॉक संघाची सावध सुरुवात

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवसअखेर शुभम तैस्वाल(41-5) याने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने केडन्स संघाला 224 धावांवर रोखले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत केडन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व्हेरॉकच्या अचूक व शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे केडन्सचा पहिला डाव 39.3 षटकात 224 धावांवर संपुष्टात आला. 10 गडी बाद झाल्याने केडन्सची अंतिम धावसंख्या 174 झाली. यात निखिल पराडकरने 88चेंडूत 8 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 86 धावा, तर गणेश गायकवाडने 74 चेंडूत 54 धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण मधल्या फळीतील फलंदाज मोठी खेळी करू शकले नाही. व्हेरॉककडून शुभम तैस्वालने 8 षटकात 41 धावात 5 गडी बाद करून केडन्सचा निम्मा संघ तंबूत परत पाठवला. कार्तिक पिल्लेने 2 गडी, तर उत्कर्ष अगरवालने 1 गडी बाद करून त्याला सुरेख साथ दिली.

या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेरॉक संघाने सावध सुरुवात केली. त्यांनी दिवस अखेर 13 षटकांत 1 बाद 85 धावा केल्या. यामध्ये सुधांशु गुंडेतीने संयमपूर्ण खेळी करत 45 चेंडूत 48 धावा केल्या. सुधांशु बाद झाल्यानंतर विनय पाटील नाबाद 30 धावा, मिझान सय्यद नाबाद 6 धावांवर खेळत आहेत. व्हेरॉक संघाचा उर्वरीत 27 षटकांचा खेळ अजून बाकी आहे.

सविस्तर निकाल : साखळी फेरी:

पहिला डाव: केडन्स: 39.3 षटकात सर्वबाद 174 (224-50धावा) (निखिल पराडकर 86, गणेश गायकवाड 54, इझान सय्यद 21, शुभम तैस्वाल 8-41-5, कार्तिक पिल्ले 6-23-2, उत्कर्ष अगरवाल 2-17-1) वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 13 षटकांत 1 बाद 85 धावा (सुधांशु गुंडेती 48, विनय पाटील नाबाद 30(), मिझान सय्यद नाबाद 6(15), गणेश गायकवाड 2-8-1);

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)