इएलइएनओ एनर्जी, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघांची विजयी सलामी

ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धा

पुणे – इएलइएनओ एनर्जी आणि सॉफ्टहार्ड ऑटोमेशन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या ई2डी स्पोर्टस यांच्या तर्फे ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत विजयी सलामी दिली.

लवळे येथील ई2डी क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सलामीच्या सामन्यात इएलइएनओ एनर्जी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 9 गडी बाद 138 धावा करताना इनव्हेंटीज इंडियाच्या संघा पुढे विजयासाठी 139 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र प्रत्युत्तरात फलंदाजी करताना इन्वेस्तिंग इंडीयाच्या संघाला केवळ 14 षटकांत सर्वबाद 73 धावाच करता आल्याने त्यांना 65 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

यावेळी इएलइएनओ एनर्जी संघाच्या हनुमंत गाडे ने नाबाद 32, रत्नदीप लोंढे 25, संदीप गरड 17 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर इएलइएनओ एनर्जी संघाला 20 षटकांत 9 बाद 138 धावांची मजल मारून दिली. तर, प्रत्युतरात खेळाताना इन्व्हेस्टिंग इंडीयाच्या किरण दातारने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर यावेळी इएलइएनओ एनर्जीकडून चेतन चव्हाणने 8 धावांत 4 गडी, हनुमंत गाडेने 22 धावांत 3 गडी बाद करत इन्व्हेस्टिंग़ इंडियाच्या संघाला 73 धावांतच रोखले. यावेळी इएलइएनओ एनर्जी संघाच्या हनुमंत गाडेला त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सामनावीराचा पुरस्काराने गौरविण्यात आले.

दुसऱ्या ब गटाच्या साखळी सामन्यात केतन पासलकर केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने एएफके संघावर 114 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 20 षटकांत 3 बाद 156 धावा केल्या. यात अजित गव्हाणे 57, प्रफुल मानकर नाबाद 49, कुमार ठक्कर 17 यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना एएफके संघाचा डाव 13.5 षटकांत सर्वबाद 42 धावांमध्येच संपुष्टात आला.

यावेळी त्यांच्या कडून अजिंक्‍य आखाडे 20, प्रशांत डांगे नाबाद 12, यांनी थोडाफार प्रतिकार केला. यावेळी सॉफ्टहार्ड ऑटोमेशनकडून केतन पासलकरने 8 धावांमध्ये 5 गडी बाद करून एएफकेचा निम्मा संघ तंबूत परत पाठवला. केतनला स्वप्निल चिखलेने 6 धावांत 3 गडी, अमित गनपुलेने 11 धावांत 1 गडी बाद करत सुरेख साथ दिली.

सविस्तर निकाल : साखळी फेरी – गट अ : इएलइएनओ एनर्जी : 20 षटकांत 9 बाद 138 (हनुमंत गाडे नाबाद 32, रत्नदीप लोंढे 25, संदीप गरड 17, सौरभ गुजर 22-4, करण चितापुरे 21-2) वि.वि. इनव्हेंटीज इंडिया : 14 षटकांत सर्वबाद 73 (किरण दातार 33, मयूर राजपूत 10, चेतन चव्हाण 8-4, हनुमंत गाडे 22-3, प्रवीण पाटील 14-1, अभिजित चव्हाण 17-1);

गट ब : सॉफ्टहार्ड ऑटोमेशन : 20 षटकांत 3 बाद 156 (अजित गव्हाणे 57, प्रफुल मानकर नाबाद 49, कुमार ठक्कर 17, ताराप्रकाश मौर्य 36-1, अजय कोकाटे 27-1, अजिंक्‍य आखाडे 33-1) वि.वि. एएफके: 13.5 षटकांत सर्वबाद 42 (अजिंक्‍य आखाडे 20, प्रशांत डांगे नाबाद 12, केतन पासलकर 8-5, स्वप्निल चिखले 6-3, अमित गनपुले 11-1).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)