कृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण

विदर्भ- मराठवाड्यात कृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या महिन्याभरात अंदाज घेऊन हा कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते आज कोल्हापुरात बोलते होते. कृत्रिम पावसाबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचे प्रदेशाध्यक्षपद रिक्त आहे. या पदासाठी नेत्याचा शोध सुरू आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, यावेळी राज्यात नवीन काही घडत असेल तर माझ्या नावाची चर्चा होतच असते, असे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)