केक कापून जागतिक सर्कसदिन साजरा

पुणे – “तुम्ही आम्हाला हसवलेत म्हणून आम्हाला खूप आनंद झाला आणि हे सांगण्यासाठीच आम्ही सर्कस तंबूत तुम्हाला भेटायला आलो,’ अशा शब्दांत लहान मुलांनी भावना व्यक्त केल्या. निमित्त होते, रेम्बो सर्कसच्या तंबूमध्ये सादर केलेल्या जागतिक सर्कस दिनाचे.

एड्‌सग्रस्त मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या “मानव्य’ संस्थेतील पन्नासहून अधिक मुले आणि रॅम्बो सर्कस मधील कलाकारांनी “जागतिक सर्कस दिन’ केक कापून साजरा केला. सध्या वाढती महागाई आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. त्याचबरोबर प्राण्यांवर बंदी असल्याने लोकांचाही ओढा कमी झाला आहे. मानधन, निवृत्ती वेतनासह आदी सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पत्रव्यवहार केला आहे, असे यावेळी सुजीत दिलीप म्हणाले. यावेळी मानव्य संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे, शशांक वाघ, प्रवीण तरवडे, आनंद धोत्रे आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)