मतदानानंतर पाण्याची स्थिती बिकट

महापौर म्हणतात…

पाणी कपात करणार किंवा अघोषित बंद असा कोणताही प्रकार होणार नाही. तसेच पाणी कपात करण्याविषयी कोणत्याही सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या नाहीत, असा खुलासा महापौर मुक्ता टिळक यांनी केला आहे. ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही, तेथील तांत्रिक कारणे शोधून ती सोडवली जातील असे टिळक म्हणाल्या.

 
पुणे – मतदान होताच त्याच दिवसापासून पुणेकरांवर पाणी कपातीची कुऱ्हाड कोसळणार आहे. ही कपात पुणेकरांनी कधीही अनुभवलेली नसेल अशी असेल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. पुणे शहरात सध्या रोज खडकवासला धरण प्रणाली तुडुंब भरल्याप्रमाणे पाणी वाटप केले जात आहे. गेल्या चार दिवसांपासून तर जिल्ह्याला कालव्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर वेगाने कमी होणार आहे.

जलसंपदाच्या आकडेवाडीनुसार जूनच्या मध्यापर्यंत हा पाणी साठा संपण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मात्र यांची चिंता भाजप-शिवसेनाला नाही त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. धरण अक्षरशः रिकामी करण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी केले आहे. फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच हे केले असून, सात दिवसानानंतर पुणेकर वेठीस धरला जाणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवसानंतर आजच्या पद्धतीने मुबलक पाणी पुणेकरांना मिळत आहे. तसेच पाणी मतदानाच्या नंतर ही देऊ असे लिखित आश्‍वासन देण्याची मागणी मनसेचे शहरप्रमुख अजय शिंदे यांनी याबाबत पत्र दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.