काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये सुद्धा भाजपला आघाडी

नवी दिल्ली: प्रत्यक्ष मतमोजणीला आता काही तास शिल्लक असला तरी एक्‍झिट पोलचे कवित्व अजूनही संपलेले दिसत नाही. काँग्रेस पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये एनडीएला बहुमत मिळणार नसून भाजपला 200 जागा मिळणार असल्याचे समजले आहे. काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार भाजपला 200 जागा तर एनडीए’ला 230 जागा मिळतील आणि काँग्रेसला 140 तर युपीए’ला 195 जागा मिळतील.

कांग्रेस पंजाब, केरळ, तामिळनाडूत, बिहार, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड आणि हरियाणा मध्ये चांगली कामगिरी करणार असल्याचं या सर्व्हेत म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यानंतर विविध संस्थानकडून एक्‍झिट पोल जाहीर करण्यात आले. या एक्‍झिट पोलनुसार एनडीए बहुमताच्या जवळ जाताना दिसत आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)