लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाचा राज्यांना ‘अलर्ट’

नवी दिल्ली – देशभरामध्ये उद्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असून याच पार्श्ववभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांमधील मुख्य सचिव आणि पोलिस प्रमुख (डीजीपी) यांना सतर्क केले असून देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूक मतमोजणीवेळी हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे देखील आदेश दिले आहेत.

देशभरामध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यांमध्ये पार पडल्या असून सातव्या टप्प्यातील मतदान रविवारी म्हणजेच १९ मे रोजी पार पडले आहे. लोकसभा निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता २३ मे म्हणजेच उद्या मतमोजणीला सुरुवात होणार असून देशाची जनता कोणाच्या बाजूने कौल देते याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×