उत्तरप्रदेश – देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
उत्तरप्रदेशमध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून या 80 लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार उत्तरप्रदेशमध्ये मतमोजणीच्या सुरवातीला भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र असून भाजप 60 जागांवर, तर बहुजन समाज पार्टी 11, काँग्रेस 1, समाजवादी पार्टी 6 जागेवर आघाडी घेताना दिसत आहे.