#Video : ‘जस्टिस फॉर काश्मिर’ भारताविरोधी पोस्टरवर बीसीसीआय भडकली

आयसीसीने दखल घेत मागितली माफी

लीड्स – भारत आणि श्रीलंका यांच्या सामन्यादरम्यान एका गोष्टीने वाद निर्माण झाला. सामन्यावेळी हेडिंग्ले स्टेडियमवरून एक विमान गेलं. यावर जस्टिस फॉर काश्मिर असं पोस्टर लावण्यात आलं होतं. वर्ल़्ड कपमध्ये असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. यावरून बीसीसीआयनं गंभीर दखल घेत आयसीसीला माफी मागायला लावली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीलंकेविरूध्दच्या सामन्यात भारताची गोलंदाजी सुरु असताना आकाशात एक विमान घिरट्या घालीत होते. या विमानावर “काश्‍मीरला न्याय द्या, भारताने काश्‍मीर स्वतंत्र करावे’ अशा आशयाचे मोठे फलक अडकविण्यात आले होते. यावरून बीसीसीआय आणि आयसीसी यांच्याच वादाला सुरुवात झाली होती.

'जस्टिस फॉर काश्मिर'भारताविरोधी पोस्टरवर बीसीसीआय भडकली

'जस्टिस फॉर काश्मिर'भारताविरोधी पोस्टरवर बीसीसीआय भडकलीलीड्स – भारत आणि श्रीलंका यांच्या सामन्यादरम्यान एका गोष्टीने वाद निर्माण झाला. सामन्यावेळी हेडिंग्ले स्टेडियमवरून एक विमान गेलं. यावर जस्टिस फॉर काश्मिर असं पोस्टर लावण्यात आलं होतं. वर्ल़्ड कपमध्ये असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. यावरून बीसीसीआयनं गंभीर दखल घेत आयसीसीला माफी मागायला लावली आहे… सविस्तर बातमीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा…. https://bit.ly/30iwbhK

Posted by Dainik Prabhat on Sunday, 7 July 2019

दरम्यान आयसीसीने भारत लंकेच्या सामन्यावेळी घड़लेल्या प्रकाराची दखल घेतली आहे. आयसीसीचे प्रमुख क्रिस टेटली यांनी यासंदर्भात बीसीसीआयची माफी मागितली आहे. तसेच सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यात आयसीसीनं या अशा विमानांवर बंदी घातली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)