काँग्रेसच्या राजीनामा सत्रात आणखी एका नावाची भर

मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील जोरदार पराभवानंतर काँग्रेस पक्षात राजीनामा सत्र सुरु झाले आहे. काँग्रेसच्या दिग्ग्ज नेत्यांच्या राजीनाम्या नंतर आता, आणखी एका नेत्यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ‘मिलिंद देवरा’ यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मात्र, हा राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.