अभियंत्यावर चिखल फेक प्रकरण
नगर – मुंबई-गोवा महामार्गावर साचलेला चिखल आणि पडलेल्या खड्ड्याना जबाबदार धरत गुरुवारी (दि.4) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपाभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतला व तसेच धक्काबुक्की करून पुलाला बांधल्या प्रकरणी संबंधितावर कारवाई करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी या घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करत कामकाज बंद करून, सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधीक्षक ईशु सिंधू यांना निवेदन दिले होते. मात्र, संबंधितावर कारवाईचे आश्वासन दिल्याने सोमवार पासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जगबुडी नदीवरील पुलावर राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता बामणे व उपअभियंता गायकवाड यांना पुलाच्या रेलिंगला बांधून मारहाण करण्यात आली होती. तसेच गुरुवारी (दि.5) रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली जवळ उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल टाकुन त्यांचा अवमान करून पुलाला बांधून लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रकार हा अपमानस्पध आहे.
याघटनेच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने तिव्र निषेध व्यक्त करत कामकाज बंद केले होते. तसेच अशा प्रकारच्या काही घटना आपल्याही जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंडळ, व अंतर्गत सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी शुक्रवार (दि. 5 व 6) जुलै रोजी कार्यालयामध्ये काम बंद आंदोलन करून, सोमवार व मंगळवार (दि.8 व 9 जुलै) रोजी सामुहिक रजेवर जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, वरिष्ठांनी घटनेची दखल घेण्यार आल्याचे आश्वासन मिळाल्याने अधिकारी, कर्मचारी यांनी आंदोलन मागे घेतले असून, सोमवारी कामकाज सुरुळीतपणे सुरु होते.