कर्जत: स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून पारनेर तालुक्यातील राळेगण सिध्दी येथील दत्तात्रय गाजरे यांची कर्जत तालुक्यातील तिघांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, दत्तात्रय गणपत गाजरे (रा.राळेगण सिध्दी ता. पारनेर) यांचा मुलगा व त्यांच्या साडूच्या मुलास कर्जत येथील छल्ली लोण्या काळे, लोण्या ऊर्फ वच्छा काळे, विशाल लोण्या काळे,(सर्व रा.कर्जत) यांनी आमच्याकडे सोने सापडले आहे. आम्ही तुम्हाला स्वस्तात देतो असे आमिष दाखवले व ते घेण्यासाठी त्यांना बोलवले. त्या दोघांना घेवून हे अंबालिका कारखान्याच्या पाठिमागील बाजूस बरकडे वस्ती ताजू या परिसरातील आरोपींच्या घराकडे घेवून गेले. त्यांच्याकडून 4 लाख रूपये घेवून, सोन्याऐवजी पितळी अंगठ्या दिल्या. याप्रकरणी गाजरे यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली आहे.