मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ हे आज नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘उद्या राज्यातील (रविवारी) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार’ असल्याची माहिती दिली आहे. तसेच विस्ताराच्या बैठकीवरून आज आम्ही आमच्या इतर सहकाऱ्यांशी देखील अंतिम चर्चा करणार असल्याचे मुखमंत्र्यांनी म्हंटले आहे.
तर, उद्या दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख ‘उद्धव ठाकरे’ पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला उद्धव ठाकरे 16 जून रोजी भेट देणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित १८ खासदार देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता.