उदयनराजेंच्या संतप्त टीकेवर रामराजे निंबाळकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…

सातारा – नीरा-देवघर पाणी प्रश्नावरून खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. नीरा-देवघर पाणी प्रश्नावरून सुरू झालेला संघर्ष आता दोन राजघरण्यापर्यंत येऊन पोचला आहे.

नीरा देवघरचे पाणी बारामतीकडे वळवण्यात रामराजे निंबाळकर यांनी पवारांना साथ दिली. तसेच त्या भागातील जमिनी लाटल्या, असा गंभीर आरोप उदयनराजे आणि रणजित निंबाळकर यांनी केले होते. उदयनराजेंच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर रामराजे निंबाळकरांनी आपली बाजू मांडली आहे.

आपल्यावर जमीन लाटण्याचा आरोप करणाऱ्यांनी जवळीमध्ये काय केले हे आम्हाला माहित नाही का..? असा सवाल रामराजे निंबाळकरांनी उपस्थित केला. यासंबंधी पुराव्याची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच असल्याचा टोला देखील रामराजे निंबाळकरांनी लगावला.

दरम्यान, याप्रकरणी या प्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासोबत मुंबई येथे एक बैठक आयोजित केली होती. मात्र शरद पवारांद्वारा आयोजित करण्यात आलेली ही बैठक देखील दोन्ही राजेंमधला वाद मिटवण्यावण्यामध्ये अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here