भोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन

भोजपुरी सिनेमांचे प्रोडक्‍शन करणारी बॉलिवूडची ऍक्‍ट्रेस नीतू चंद्रा आता लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. भोजपुरी सिनेमांमध्ये नेहमी गाणी गाणारी नीतू चंद्रा आता हॉलिवूडमधील “द वर्स्ट डे’या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहे. बल्गेरियाची स्तानिस्लावा आईवी डायरेक्‍ट करणार आहे. या शॉर्टफिल्ममधील कामाचा अनुभव दीर्घकाळासाठी उपयोगी असणार आहे. कारण हा एक “लर्निंग एक्‍सरियन्स’ असणार आहे, असे नीतू चंद्राने सांगितले. या शोर्टफिल्ममध्ये नीतू चंद्रा प्रथमच निगेटिव्ह रोल साकारणार आहे. याच शॉर्टफिल्मला टिव्ही सिरीयलमध्येही रुपांतरित केले जाणार आहे, असेही समजले आहे. या शॉर्टफिल्मच्या बरोबर नीतू चंद्रा कोरियन युथ ऍक्‍शन ड्रामा “नराए’मध्येही दिसणार आहे.

नीतू चंद्रा, अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या “गरम मसाला’ची खूप जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडपेक्षा भोजपुरी सिनेमांकडेच अधिक लक्ष दिले. तिचा जन्मच बिहारमधील असल्याने तिला भोजपुरी भाषा, रहाणीमान, फॅशन, ट्रेन्ड चांगले माहित आहे. बॉलिवूडमधील “ट्रॅफिक सिग्नल’ आणि “ओय लकी लकी ओय’सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये नीतू चंद्राने काम केले होते. ऍक्‍टिंग आणि प्रॉडक्‍शनव्यतिरिक्‍त तिला तायक्‍वांदोमध्ये विशेष रस आहे आणि तिने हॉंगकॉंगमध्ये 1997 मध्ये आंतरराष्ट्रीय तायक्‍वांदो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्वही केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)