चुलत सासऱ्याचा सुनेवर चाकुने वार
पुणे,दि.3- चुलत सासऱ्याने सुनेवर घरगुती वादातून चाकूने वार केले. ही घटना मुंढवा येथे शनिवारी घडली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 26 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार बाळासाहेब बाबुराव गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला व आरोपी चुलत सासरा हे शेजारी शेजारी रहाण्यास आहेत. फियादीच्या घराच्या वरच्या मजल्याचे काम सुरू आहे. आरोपीने फियार्दीच्या पतीस तु खाली रहा व तुझ्या भावास वरच्या मजल्यावर राहु दे असे सांगितले. यावर फिर्यादीने तीच्या चुलत सासऱ्यास तुम्ही कशाला सांगता कुठे रहायचे ते, घराचा सर्व खर्च आम्ही केला आहे असे म्हटले. याचा राग मनात धरुन चुलत सासऱ्याने त्याच्या घरातून चाकू जाऊन आणला. यानंतर भांडणे काढत फिर्यादीच्या हातावर चाकूने वार करत तीला जखमी केले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.