पुणे,दि.25- बांधकाम व्यवसायीकाचे कार्यालय फोडून 25 लाख 45 हजाराची रोकड चोरण्यात आली. ही घटना कल्याणीनगर येथील करिआ डेव्हलपर्सच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित नितीन करिआ(रा.सुयोजना सोसायटी, कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे कार्यालय सोमवारी रात्री बंद असताना बाथरुमचा एक्झॉस फॅन तोडून चोरांनी आत प्रवेश केला.यानंतर केबीनमधील कपाटाचे लॉक तोडून 25 लाख 45 हजाराची रोकड चोरली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ननवरे करत आहेत.