नेवासा – अण्णा तुम्ही गावाचा कायापालट कसा केला? तुमच्या राळेगणसिद्धीला लोक का भेटी देतात? तुम्हाला सुरुवातीला लोकांचा विरोध झाला का? तुमच्या सोबत पोलीस का असतात? यासारख्या कुतूहल पर विविध प्रश्नांची च्या माध्यमातून भालगावच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला.निमित्त होते ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथील शैक्षणिक सहल क्षेत्रभेटीदरम्यान राळेगणसिद्धी येथे घेतलेली प्रत्यक्ष मुलाखत.
नेवासे तालुक्यातील जिल्हा परिषद भालगाव शाळेने यावर्षी अहमदनगर जिल्हा दर्शन या शैक्षणिक सहल,क्षेत्रभेटी चे नुकतेच आयोजन केले होते. यामध्ये नेवासा तालुक्यातील जगप्रसिद्ध श्री क्षेत्र शनिशिंगणापूर,मुळा सहकारी साखर कारखाना सोनई,मुळा धरण व वीज निर्मिती प्रकल्प, रिलायन्स स्मार्ट बाजार मॉल,भुईकोट किल्ला, रणगाडा संग्रहालय,आदर्श गाव राळेगणसिद्धी येथील संग्रहालय,समाजसेवक अण्णा हजारे यांची मुलाखत आणि मार्गदर्शन,निघोज येथे प्रसिद्ध रांझणखळगे व मळगंगा देवीचे मंदिर असे अहमदनगर दर्शन अनुभवले.
राळेगणसिद्धी येथील गावाचा झालेला कायापालट समजावून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी जन आंदोलन संग्रहालयाला भेट दिली. यानंतर नियोजित भेटी अंतर्गत अण्णांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला. गावाची पूर्वीची स्थिती व आत्ता झालेला बदल, कायापालट करण्यासाठी केलेले प्रयत्न,आलेल्या अडचणी, जनलोकपाल, माहितीचा अधिकार, भ्रष्टाचार विरोधी भारतभर केलेल्या जनआंदोलनाची माहिती दिली. यावेळी कुतूहलाने विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांना स्वच्छता, व्यसनाधीनता,देशसेवा,पर्यावरण संवर्धन चा संदेश दिला. यावेळी भालगावच्या विद्यार्थ्यांच्या स्वच्छता मॉनिटर उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केलं.या भेटीदरम्यान मुलांना प्रेरणा मिळाली. यावेळी सहलीचे नेतृत्व शाळेच्या मुख्याध्यापिका सरस्वती लोंढे,शिक्षक राहुल आठरे,दत्तात्रय शिंदे,शितल झरेकर यांनी यशस्वीरीत्या केले.
या सहली दरम्यान मुळा सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन विद्यार्थ्यांनी साखर कशी तयार होते ही प्रकिया जाणून घेतली. अहमदनगर येथील रिलायन्स मॉल ला भेट देऊन विद्यार्थ्यांनी खरेदीचा आनंद लुटला.तसेच राहुरी येथील मुळा धरण,भुईकोट किल्ला , रणगाडा संग्रहालय ,आशिया खंडातील सर्वात मोठे कुकडी नदीवर असलेले कुंडाचे अभ्यास करत विविध स्थळांना भेटी देत माहिती जाणून घेतली.
सहल यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सलीम शेख, उपाध्यक्ष रवींद्र आहेर,सर्व सदस्य,मुळा पाटबंधारे विभाग व मुळा कारखाना सोनई चे प्रशासन अधिकारी,गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटेकर,केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद ,शिक्षिका मनीषा साळवे,जनाबाई जाधव,सर्व पालक यांचे सहकार्य लाभले.