आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च च्या व्यवस्थापन विभागाच्या विद्यार्थ्यांनी डॉ.सिंधुताई सपकाळ यांची सन्मती बाल निकेतन आश्रम या ठिकाणी भेट घेतली.
डॉ.सिंधुताई सपकाळ यांनी यावेळी दिलेल्या मुलाखती मध्ये आपला जीवनप्रवास उलगडून सांगितला तसेच त्यांच्या एकूण ७ आश्रमाचे व १००० पेक्षा जास्त अनाथ विद्यार्थ्यांनचे “व्यवस्थापन” कसे केले जाते याची पूर्ण माहिती दिली.व्यवस्थापन विभागाच्या कु.रोशन राजूरकर याने रेखाटलेले चित्र व रोख स्वरूपात काही देणगी झील कॉलेज च्या वतीने माईंना देण्यात आली.
झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च चे प्राचार्य डॉ.अजित काटे आणि डॉ.ऋषिकेश काकांडीकर, एमबीए विभाग प्रमुख , यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.सचिन वाडेकर होते.