yusuf pathan loksabha election : माजी क्रिकेटपटू आणि आयपीएल स्टार युसूफ पठाणला तृणमुल कॉंग्रेसने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली असून युसूफने कालपासून आपला प्रचारही सुरू केला आहे. गुजरातचा युसूफ बंगालमधून लढत असल्यामुळे तो बाहेरचा असल्याचे म्हटले जाते आहे. त्याला युसूफने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण देत उत्तर दिले आहे.
यूसूफ म्हणाला की मोदी हे गुजरातचे आहेत. मात्र ते उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून निवडणूक लढवतात. तर मी येथून बंगालमधून निवडणूक लढवत असेल तर काय समस्या आहे? असा सवाल युसुफने उपस्थित केला. | yusuf pathan loksabha election
मी बंगालचा मुलगा असून येथे राहायला आलो आहे असं देखील युसुफने यावेळी स्पष्ट केले. पठाणला कॉंग्रेसचे बडे नेते अधिररंजन चौधरी यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासंदर्भात बोलताना तो म्हणाला मी त्यांना चांगली लढत देण्याचा प्रयत्न करेल. | yusuf pathan loksabha election
दरम्यान, अधिररंजन चौधरी यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया देताना तृणमूल कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. राजकारण आणि क्रिकेट एकसारखे असत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. बहरामपूर मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला असून येथून चौधरी स्वत: पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. | yusuf pathan loksabha election