मुंबई – अभिनेत्री रवीना टंडनने 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अक्षय कुमार, गोविंदा, सुनील शेट्टी यासारख्या अभिनेत्यांसोबत तिने काम केले आहे. सध्या रवीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक मुद्द्यांवर ती सोशल मीडियाद्वारे तिचे मत व्यक्त करताना देखील दिसते. याशिवाय ती वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टीही शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.
रवीनाने नातवासाठी खास पोस्ट शेअर करत नातवाचे आणि मुलीचे फोटोही शेअर केले आहेत. “माझ्या प्रिय बाळाच्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या प्रिय रुद्र, तुला चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! महादेवाच्या कृपेने तुझं आयुष्य सदैव प्रेम आणि आनंदाने, वैभवाने आणि यशाने उजळून निघो. आयुष्मान भव” सुखीभव.. तुझीच आजी,” असे कॅप्शन रवीनाने या पोस्टला दिले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, 90 च्या दशकातील सर्वात आवडती अभिनेत्री रवीना टंडनने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्या दोघी रवीनाच्या एका चुलत भावाच्या मुली होत्या, ज्यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर रवीनाने जबाबदारी घेतली होती. तिच्या या दोन्ही मुली आता विवाहित आहेत. तिच्या या मुलींची लग्न झाली असून छायाला रुद्र नावाचा मुलगा आहे. त्याच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त रवीनाने खास पोस्ट शेअर केली होती. रवीनाच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी रुद्रला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.