मुंबई -अभिनेत्री ‘गौतमी देशपांडे’ हिने आपली बहीण मृण्मयी देशपांडे हिच्या पावलावर पाऊल ठेवत. छोट्या पडद्यावरील ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोघी सख्या बहिणी असून हुबेहूब एकमेकांसारख्या दिसतात. गौतमी ने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी कलाविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आता ती महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री झाली आहे.
गौतमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या फॅन्ससोबत फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रावर काही फोटो शेअर केले असून, त्यात गौतमीचा सोज्वळ अंदाज दिसून येत आहे. तिचं हे घायाळ करणारं सौंदर्य पाहून फॅन्स तिच्या प्रेमातच पडले आहेत.
गौतमी च्या एकसे बढकर एक फोटोंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळत असून, फॅन्सनी तर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.