नागपूर – भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमधील टीका टीप्पणी अद्याप थांबलेली नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. तीन पक्षांच्या सरकारमध्ये पदांसाठी संघर्ष सुरू असल्याची टीका विखे पाटील यांनी केली होती. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चालला आहे. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच, असं अनिल देशमुख यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करून म्हटले. राधाकृष्ण विखे पाटीलजी सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय. काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खूर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललाय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच, असा टोला अनिल देशमुख यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला आहे.
.@RVikhePatil जी सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय.काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खुर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललांय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच! pic.twitter.com/0EDIfYstrM
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 6, 2021
काही दिवसांपूर्वी उपोषणाचे हत्यास उपसणारे अण्णा हजारे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेते राळेगणसिद्धी येथे दाखल झाले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी राळेगणसिद्धी येथे अण्णांची भेट घेतली होती. यावेळी अण्णांसह भाजप नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. तेव्हा राधाकृष्ण विखे-पाटील हे फडणवीस आणि अण्णा हजारे यांच्या मागे उभे असल्याचे दिसले. त्याचा हा फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून देशमुख यांनी टीका केली आहे.