उत्तर प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार; योगी सरकारमध्ये सात नवीन मंत्र्यांनी घेतली शपथ

लखनौ – उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक 6 महिन्यांवर येवून ठेपलेली असताना योगी सरकारने रविवारी तिसऱ्यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. याप्रसंगी नवीन 7 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात कॉंग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या जितिन प्रसाद यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेत नवीन मंत्रिमंडळात तीन ओबीसी, दोन दलित उमेदवारांसह एसटी आणि ब्राम्हण चेहरा असलेल्या प्रत्येकी एक-एक उमेदवाराची निवड केली. आता मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या वाढू 60वर गेली आहे.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी 7 मंत्र्यांना शपथ दिली. यामध्ये कॉंग्रेसमधून तीन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले जितिन प्रसाद यांना सर्वात प्रथम शपथ देण्यात आली. तसेच छत्रपाल गंगवार, पलटू राम, संगीता बिंद, संजीव कुमार, दिनेश खटीक आणि धर्मवीर प्रजापति यांनी शपथ घेतली.

दरम्यान, 2017मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजप आणि मित्र पक्षांनी 325 जागा जिंकत बहुमत मिळविले होते. यानंतर 19 मार्च 2017 रोजी सरकार स्थापन करत पहिला शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर 21 ऑगस्ट 2019 रोजी दुस-यांदा मंत्रिमंडळालाचा विस्तार करण्यात आला होता. ज्यात 23 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी आणखी 7 मंत्र्यांची वर्णी लावण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.