आंध्र, ओडिशाला गुलाब वादळाचा दणका; ताशी 85 किमी वेगाने वारे

भुवनेश्‍वर, हैदराबाद, श्रीकाकूलम – ओडिशा आणि आंद्रप्रदेशच्या किनाऱ्यावर गुलाब वादळ रविवारी रात्री धडकले. यावेळ िवाऱ्याचा वेग 75 ते 85 किमी प्रतीतास होता. यावेळी श्रीकाकूलम येथे मच्छिमारांच्या परतणाऱ्या बोटीला वादळाचा तडाखा बसल्याने दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला तर अन्य एक जण बेपत्ता झाला. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीस तसेच राज्यांच्या आपत्कालीन विबाघांच्या मदत कार्याचा वेग वाढवल्याचे रविवारी रात्री उशीराचे वृत्त आहे. या वादळात झालेल्या वित्त हानीचे काम उद्या सोमावारी सकाळी सुरू होण्याची शक्‍यता आहे.

वादळ गुलाब जमिनीवर धडकण्याची प्रक्रिया रविवारी साऐंकाळी उशीरा सुरू झालीू. त्यावेळ िवाऱ्याचा वेह 75 ते 80 किमी प्रतीतास एवढा होता. आंध्र प्रद्रशातील पालसा गावात मच्छिमारांच्या बोटीला वादळाचा तडाखा बसला. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण बेपत्ता झाला. तीन मच्छिमार पोहत किनाऱ्यावर आले. वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशला झोडपले. अनेक घरांची पडझड झाली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. केंद्र सरकारकडून हवी असेल मदत देण्याच्रआश्‍वासन मोदी यांनी दिले.

दरम्यान गनजाम जिल्ह्यातील पाच हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सुमारे 900 पक्‍क्‍या इमारती शोधून तेथे या नागरिकांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 350 गर्भवती महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्‌याचे आद्रश देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.