मुंबई – उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावरून एका पत्रकाराने उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल का असा प्रश्न विचारला असता योगींनी भाजपचेच सरकार येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मी पुन्हा येईन म्हणत मुख्यमंत्रीपदी आपणच विराजमान होणार असल्याचे त्यांनी म्हटलं.
मैं आऊंगा न… pic.twitter.com/dA5X15oQbV
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 15, 2021
पत्रकाराने उत्तर प्रदेशच्या राजकारणात गेल्या 35 वर्षांत कुठलाही मुख्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आला नाही? असा प्रश्न विचारला होता यावर त्यांनी उत्तर देताना योगींनी मै आऊंगा ना म्हणत मी पुन्हा येईन… असेच म्हटले आहे. तसेच, आम्ही रेकॉर्ड तोडण्यासाठीच आलो आहोत, माझा जो ट्रेंड सुरू आहे. त्यानुसार, भाजपला 350 पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत, असे म्हणत एकहाती सत्ता येणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या हा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.
तत्पूर्वी, महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही निवडणुकीत मी पुन्हा येईन असाच विश्वास व्यक्त केला होता. ही कविता महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली होती.