नवी दिल्ली – बॉलिवूड व पंजाब चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक योयो हनी सिंग उर्फ हिरदेश सिंग याच्या विरोधात त्याची पत्नी शालीनी तलवार हिने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. तिने दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी तानिया सिंग यांच्या कडे ही तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत शालिनीने घरगुती हिंसाचार, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार व आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने या प्रकरणी हनीसिंगला नोटीस पाठवली असून त्याच्याकडून उत्तर मागितलं आहे. 28 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यासाठी हनी सिंगला मुदत देण्यात आली आहे.
शालिनीने तिच्या याचिकेत म्हटले आहे, हनी सिंगने मारहाण केली, लैंगिक शोषण केला, मानसिक छळ आणि आर्थिक फसवणूक केली असा आरोप तिने याचिकेत केला आहे. हनी सिंगच नाही तर त्याचे आई वडील आणि बहिण यांच्या विरोधातही मारहाण करणं, छळ आणि शोषण असे आरोप केले आहेत. शालिनीने केलेल्या या याचिकेनंतर तीस हजारी न्यायालयाने हनी सिंग विरोधात नोटीस जारी केली आहे. दोघांची संयुक्त मालमत्ता विकू नये, शालिनी -बाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे स्पष्ट निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, यो यो हनी सिंगने 2011 साली कॉकटेल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. योयो हनी सिंग हा त्याच्या पार्टी साँगसाठी ओळखला जातो. हनी सिंग याने 2014 पर्यंत एका रिअॅलिटीशोमध्ये त्याच्या पत्नीला आणत सर्व चाहत्यांना धक्का दिला होता. त्या रिअॅलिटी शो नंतर तो विवाहीत आहे हे सर्वांना समजले होते.