पिरंगुट – येथील औद्योगिक वसाहतीतील फ्रांकोईस कॉम्प्रेसर कंपनीतील लॉजिस्टिक्स अधिकारी सुभाष वाजे यांचा सत्कार करण्यात आला. वाजे आणि त्यांच्या सात सहकाऱ्यांनी नुकतेच काश्मिर ते कन्याकुमारी हे 3600 किलोमीटर अंतर 14 दिवसांत सायकलवरून पूर्ण केले आहे.
पिरंगुट ग्रामपंचायतीच्या वतीने सुभाष वाजे यांचा मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी सभापती महादेव कोंढरे व सरपंच चांगदेव पवळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच राहुल पवळे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य प्रविण कुंभार, कोंढुरचे माजी सरपंच शंकर मरगळे, पिरंगुट व्यापारी महासंघचे उपाध्यक्ष विशाल पवळे, उद्योजक सदाशिव निकटे, उद्योजक सागर पवळे, उद्योजक मनोज निकटे, प्रॉडक्शन मॅनेजर उत्तम ठुले आदी उपस्थित होते. माजी सभापती महादेव कोंढरे व सरपंच चांगदेव पवळे म्हणाले की, पर्यावरण रक्षणाबरोबरच सुदृढ शरीरासाठी सायकलिंग महत्त्वाचे आहे.
कंपनीतील अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला हा स्तुत्य उपक्रम आहे.
पिरंगुट (ता. मुळशी) :सुभाष वाजे यांचा सत्कार करताना माजी सभापती महादेव कोंढरे, सरपंच चांगदेव पवळे व उपस्थित ग्रामस्थ.