“होय, मी मित्रांसाठी काम करतो अन् करत राहणार”, मोदींचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. कोलकाता येथे आयोजित संभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच राहुल गांधी यांच्याकडून सतत करण्यात येत असलेल्या टीकेला मोदींनी प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान मोदी आपले दोन मित्र अडानी-अंबानी यांनाच मदत करतात, अशी टीका काँग्रेसनेते राहुल गांधी करत आले आहेत. राहुल गांधी यांच्या टीकेला आज मोदींनी प्रत्युत्तर दिले. मोदी म्हणाले की, आजकाल आमचे विरोधक म्हणतात की, मोदी मित्रांसाठीच काम करतात. आपणा सर्वांना ठावूकच आहे की, आपण लहान असताना मस्ती करतो, ज्यांच्यासोबत शाळेत जातो, खेळतो त्यांच्या सोबत आपलं नातं आयुष्यभरासाठी जोडलं जातं. माझं बालपण गरिबीत गेलं आहे. त्यामुळे माझ्या मित्रांचं दु:ख काय आहे हे मला कळतं. त्यामुळे मी मित्रांसाठी काम करत  असून मित्रांसाठीच काम करत राहिल, असं मोदींनी विरोधकांना ठणकावून सांगिलते. त्यानंतर मोदींनी बंगालमधील मित्रांसाठी काम करत असल्याचं सांगत आपण येथील मित्रांना गॅस, घरं दिल्याचं मोदी म्हणाले.


यावेळी मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ताशेरे ओढले. ममता बॅनर्जी यांनी राज्याची लूटमार केली. यामुळे भाजपला लोकांचं प्रेम मिळत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.