SBIमध्ये उघडा तुमच्या मुलांचे ऑनलाइन सेव्हिंग अकाउंट; मिळतात अनेक फायदे

नवी दिल्ली – जर तुम्ही तुमच्या मुलांचे भारतीय स्टेट बॅंकेत (SBI)बचत खाते उघडू इच्छीत असाल तर आता तुम्हाला बॅंकेत जाण्याची आवश्‍यकता नाही. तुम्ही घरबसल्या मुलांचे ऑनलाइन खाते उघडू शकता. एसबीआयने लहान मुलांसाठी पहला कदम (pehla kadam) आणि पहली उडान (pehli udaan) नावाने सेव्हिंग अकाऊंट उघडण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच या अकाउंटमधून मुलांसाठी दररोज पैसे काढण्याची मर्यादा देखील निश्‍चीत केली आहे. जाणून घ्या खाते कसे उघडावे…

1) पहला कदम सेव्हिंग अकाउंट –

 • या अकाउंट प्रमाणे कोणत्याही वयोगटातील अल्पवयीन मुलांसोबत त्यांचे आई-वडिल ज्वाइंट अकाउंट उघडू शकता.
 • याला पालक किंवा स्वत: मुलं ऑपरेट करू शकतात.
 • हे कार्ड अल्पवयीन मुलं आणि पालकांच्या नावे दिले जाईल.

पहला कदम सेव्हिंग अकाउंट चे फायदे –

 • या अकाउंटमध्ये मोबाइल बॅंकिंगची सुविधा उपलब्ध आहे. ज्याद्वारे सर्व प्रकारचे बिल पेमेंट करता येऊ शकतात. तसेच यात 2000 रूपयांपर्यंत दररोज ट्रांजेक्‍शन करण्याची मर्यादा आहे.
 • मुलांच्या नावे अकाउंट उघडल्यास ATM- डेबिट कार्डची सुविधा देखील मिळते. हे कार्ड मुलांच्या व पालकांच्या नावे जारी करण्यात येते. याद्वारे 5000 रूपयांपर्यंतची रक्कम काढता येते.
 • इंटरनेट बॅंकिंग सुविधेत दररोज 5000 रूपयांपर्यंत ट्रांजेक्‍शन करण्याची मर्यादा आहे. याद्वारे तुम्ही सर्व प्रकारची बिलं भरू शकता.
 • पालकांसाठी पर्सनल ऍक्‍सिडेंट इन्शुरन्स देखील मिळतो.

2) पहली उडान सेविंग अकाउंट –

 • हे अकाउंट 10 वर्षाहून अधिक वय असणारी मुलं जी सही करू शकतात ते पहली उडान चे खाते उघडू शकतात.
 • हे अकाउंट पूर्णपणे मुलांच्या नावे असेल.
 • मुलं एकटे ते अकाउंट ऑपरेट करू शकतात.

या सुविधा मिळतात –

 • यात देखील ATM-डेबिट कार्डची सुविधा मिळते आणि दररोज 5000 रूपयांपर्यंत पैसे काढू शकता.
 • मोबाईल बॅंकिंग सुविधा देखील मिळते. ज्याद्वारे दररोज 2000 रूपयांपर्यंत ट्रांसफर करू शकता.
 • अनेक प्रकारचे बिलं भरू शकता.
 • इंटरनेट बॅंकिंग सुविधेद्वारे दररोज 5000 रूपयांपर्यंत ट्रांसफर करू शकता.
 • यात चेकबुकची सुविधा मिळते
 • यात ओव्हर ड्राफ्ट ची सुविधा मिळत नाही.

असे उघडा मुलांचे खाते –

 • सर्वात पहिले एसबीआयच्या ऑफिशियल वेबसाइट sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
 • त्यानंतर अकाउंट्‌स टॅब वर क्‍लिक करून सेव्हिंग अकाउंट ऑफ माइनर्स चा पर्याय निवडा.
 • नंतर अप्लाय नाऊ वर क्‍लिक करा. त्यानंतर तुम्हाला डिजिटल आणि इंस्टा सेव्हिंग अकाउंट चा एक पॉप-अप दिसेल.
 • नंतर Open a Digital Account टॅब वर क्‍लिक करावे.
 • यानंतर खाते उघडण्यासाठी सर्व माहिती भरा.
 • येथे एक लक्षात ठेवा की ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकवेळ एसबीआयच्या ब्रॅंचमध्ये जाने जरूरी आहे.
 • याव्यतिरिक्त तुम्ही ऑफलाइन पर्यायाद्वारे देखील एसबीआयच्या ब्रॅंचमध्ये जाऊन अकाउंट उघडू शकता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.