Pune : महिला दिनानिमीत्त ‘सेफ ऍण्ड डिफेन्स’ ड्रायव्हिंग कोर्स

पुणे – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ब्रीजस्टोन इंडिया, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन व आय.डी.टी.आर. यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांच्या सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन केले आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी सांगितले, हे प्रशिक्षण नाशिक फाटा येथील आयडीटीआर 8 व 9 मार्च रोजी आयोजीत केले आहे.

सहभागी महिलांना सेफ ऍण्ड डिफेन्स ड्रायव्हिंग, रस्ता सुरक्षा व रोड रुल आदींची माहिती व प्रात्यक्षिक दिले जाईल. ड्रायव्हिंग क्षेत्रातील महिलांनी याचा लाभ घ्यावा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.