कोलकाता – राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याची तुलना आता काही समीक्षक चक्क सौरव गांगुलीशी करत आहेत. ज्या पद्धतीने जयस्वालने रणजी, आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले ते गांगुलीशी खूप मिळते जुळते आहे. तसेच ज्या प्रकारे गांगुली ऑफ साइडचा दादा फलंदाज गणला जात होता, तेच कसब जयस्वाल दाखवत आहे. डावखुरा जयस्वाल फलंदाजी करताना पाहून आपल्याला गांगुली खेळत असल्याचा भास होतो, असेही काही समीक्षकांनी म्हटले आहे.
मात्र, जयस्वालने यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. मी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पाऊल टाकलेले नाही, गांगुली एक महान फलंदाज व कर्णधार म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांची आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे जयस्वालने म्हटले आहे.