Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) बॉलीवूडसह साऊथ सिनेमांमध्येही काम केले आहे. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतून मृणालला ओळख मिळाली. याशिवाय ‘विटी दांडू’ या मराठी सिनेमातही काम केले आहे. सध्या मृणाल तिच्या ‘हाय नॅना’ या तेलुगू सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. यावेळी तिची भेट हॅरी पॉटर फेम हॉलिवूड अभिनेता डॅनियल रॅडक्लिफसोबत (Daniel Radcliffe) झाली आहे. यावेळी तिने डॅनियलसोबत सेल्फी देखील घेतला. मृणालने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूरने इन्स्टाग्रामवर न्यूयॉर्कच्या काही स्टोरीज शेअर केल्या. यामध्ये तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात ती हॅरी पॉटरला पाहून खूश झाली. न्यूयॉर्कमध्ये भर गर्दीत हॅरी पॉटर मास्क लावून चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. मृणालने हा व्हिडिओ शूट केला असून ती ‘आय लव्ह यू डॅनियल’ असंही म्हणत आहे. यावर डॅनियलही तिला ‘थँक्यू व्हेरी मच’ अशी प्रतिक्रिया देत आहे. या व्हिडिओनंतर मृणालने डॅनियलसोबतचा सेल्फीही शेअर केला आहे. स्वत: हॅरी पॉटरनेच हा सेल्फी काढला आहे.
मृणाल सध्या ‘हाय नॅना’ चं प्रमोशन करत आहे. हा एक फॅमिली ड्रामा आहे. हा सिनेमा तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मृणाल ठाकूरचे नाव ‘है नन्ना’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. या अभिनेत्रीचा हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यामुळे मृणाल हा चित्रपट प्रेक्षकांचे थिएटरमध्ये भरपूर मनोरंजन करत आहे. या तेलगू भाषेतील रोमँटिक चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुनने अलीकडेच या चित्रपटाचे कौतुक केले होते. या चित्रपटानंतर मृणाल ठाकूर लवकरच विजय देवरकोंडासोबत ‘VD13’ सिनेमात दिसणार आहे.