टोकियो – भारतीय कुस्तीपटू रवी दहिया याला ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटातील अंतिम सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात रुसच्या जावुर युगुएवने रवीचा ४-७ असा पराभव केला.
विश्व विजेतेपदक विजेत्या जावुर युगुएवने यापूर्वी २०१९मध्ये विश्वविजेता स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभूत केले होते. फायनलमध्ये धडक मारलेल्या रवीचे यापूर्वीच रौप्य पदक पक्के झाले होते.
आजच्या सामन्यांमध्ये रवी प्रथम २-४ ने मागे होता. यानंतर युगुएवने ही बढत २-७ पर्यंत वाढवली. मात्र रवीने पुन्हा एकदा जोरदार खेळ करत सलग दोन गुणांची कमाई केली. रवीने ही बढत ४-७ इतकी कमी केली.