टोकियो – ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने आज कांस्य पदक पटकावले. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये वैयक्तिक पदक पटकावणारी पी व्ही सिंधू ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. सिंधूच्या या यशानंतर देशभरातील नागरिक तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी तिच्या या यशाबाबत आनंद व्यक्त करत तिला शुभेच्छा संदेश दिले आहेत.
अशातच आता पी व्ही सिंधूची आई पी विजया यांनी देखील आपल्या मुलीच्या यशाबाबत आनंद व्यक्त केला आहे. पी विजया यांनी सिंधूच्या विजयाबाबत समाधान व्यक्त करताना, “आम्ही खूप आनंदी आहोत. तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले. आम्ही ती परतल्यानंतर जल्लोषात स्वागत करू. उपांत्य फेरीतील पराभवानंतर ती निराश झालेली. मात्र आम्ही तिला नाराज न होता शांत राहून चांगला खेळ कर असं सांगितलं.”
Hyderabad | We are very happy. She won two medals, a silver at Rio Olympics and a bronze in Tokyo. We will definitely celebrate. She was a little upset yesterday. We simply asked her to relax and play well: PV Sindhu’s mother P Vijaya. pic.twitter.com/Jhl5tkQYF7
— ANI (@ANI) August 1, 2021
दरम्यान, ऐतिहासिक कामगिरीनंतर पी व्ही सिंधूने प्रतिक्रिया देताना, “मी सध्या खूप आनंदात आहे. मी अनेक वर्षांपासून कठोर परिश्रम घेतले आहेत. माझ्या मते मी उत्तम कामगिरी केली. माझ्या मनामध्ये अनेक भावना घोंगावत आहेत, कांस्य पदक मिळाले म्हणून आनंदित व्हावं की अंतिम फेरीपर्यंत पोहचले नाही याच दुःख करावं” असं म्हंटलं.
“I’m on cloud nine. Worked hard for so many years. I think I’ve done really well. I had a lot of emotions going through me – should I be happy that I won bronze or sad that I lost the opportunity to play in the final?” PV Sindhu in a statement after winning bronze medal pic.twitter.com/eCpk5cOVZP
— ANI (@ANI) August 1, 2021