नवी दिल्ली – ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने देशाची मान गर्वाने उंचावली. सिंधूने आज कांस्य पदक पटकावत भारताच्या पदक तालिकेत भर घातली. सिंधूच्या या दैदिप्यमान यशासाठी सर्व भारतीय तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सिंधूला तिच्या या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सिंधूच्या या यशानंतर तिचे वडील पी व्ही रमणा यांनी आनंद व्यक्त केला आहे. रमणा यांनी सिंधूच्या विजयाबाबत बोलताना, “ती ३ ऑगस्टला मायदेशी परतणार आहे. मी तिला घरी आणण्यासाठी दिल्लीला जाणार आहे. आपल्याला देशासाठी जास्तीत जास्त पदके आणायची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूला प्रोत्साहित केलं तसेच ती मायदेशी परतल्यानंतर आपण सोबत आईसस्क्रीम खाऊ असं सांगितलं. सिंधू मायदेशी परतल्यानंतर पंतप्रधानांसह आईसस्क्रीम खाणार आहे.”
I think she’s coming on Aug 3. I’m planning to go to Delhi. We have to get as many medals as we can for country at Olympics. PM encouraged her & told Sindhu that we’ll eat ice-cream together after returning from Tokyo. Now, she’ll eat ice-cream with PM: PV Ramana, Sindhu’s father pic.twitter.com/5tChxNm3SG
— ANI (@ANI) August 1, 2021
सिंधूच्या डाएटमधून आईसक्रीम वर्ज्य
सिंधूला आईसक्रीम फार जास्त आवडते असा खुलासा तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यानंतर केला होता. तिचे पूर्वीचे प्रशिक्षक गोपीचंद यांनी रिओ ऑलिम्पिक तयारीच्या काळात तिच्या डाएटमधून आईसक्रीम वर्ज्य केले होते. त्यावेळी तिने आपण आता सर्वात आधी आईसक्रीमचा आनंद घेणार असल्याचं म्हंटलं होत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
सिंधूच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर संदेश पोस्ट करत तिचे कौतुक केले. “सिंधूच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आपण सर्व उत्साहित झालो आहोत. सिंधूला ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्याबाबत शुभेच्छा. ती भारताची शान व उत्कृष्ट ऑलिम्पिकपटू आहे.
We are all elated by the stellar performance by @Pvsindhu1. Congratulations to her on winning the Bronze at @Tokyo2020. She is India’s pride and one of our most outstanding Olympians. #Tokyo2020 pic.twitter.com/O8Ay3JWT7q
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2021
ऐतिहासिक कामगिरीनंतर सिंधूची पहिली प्रतिक्रिया
ऐतिहासिक कामगिरीनंतर पी व्ही सिंधूने प्रतिक्रिया देताना, “मी सध्या खूप आनंदात आहे. मी अनेक वर्षांपासून कठोर परिश्रम घेतले आहेत. माझ्या मते मी उत्तम कामगिरी केली. माझ्या मनामध्ये अनेक भावना घोंगावत आहेत, कांस्य पदक मिळाले म्हणून आनंदित व्हावं की अंतिम फेरीपर्यंत पोहचले नाही याच दुःख करावं” असं म्हंटलं.
“I’m on cloud nine. Worked hard for so many years. I think I’ve done really well. I had a lot of emotions going through me – should I be happy that I won bronze or sad that I lost the opportunity to play in the final?” PV Sindhu in a statement after winning bronze medal pic.twitter.com/eCpk5cOVZP
— ANI (@ANI) August 1, 2021