Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगच्या नवव्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघ कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ( ,Mumbai captain Harmanpreet ) अनुपस्थितीत खेळला. याआधी हरमनप्रीत यूपीविरुद्धच्या सामन्यातही दिसली नव्हती. त्या सामन्यात संघाला यूपीविरुद्ध सात गडी राखून पराभव पत्करावा लागला होता तर नंतरच्या सामन्यात एमआयने आरसीबीविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात मुंबईला जेतेपदावर नेणारी हरमनप्रीत दुखापतीमुळे शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात सहभागी होऊ शकली नाही. या दोन्ही सामन्यांमध्ये नेट सिव्हर ब्रंटने संघाचे नेतृत्व केले. 5 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात हरमनप्रीत पुनरागमन करू शकते, असे मानले जात आहे.
दिल्ली आणि गुजरातविरुद्ध हरमनप्रीतची चमकदार कामगिरी
मुंबईसाठी 12 आयपीएल सामने खेळलेल्या हरमनप्रीतने 382 धावा केल्या आहेत. तिने महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या आवृत्तीत दोन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 34 वर्षीय फलंदाजाने 55 धावा केल्या होत्या. त्याचवेळी तिने गुजरातविरुद्ध 46 धावांची नाबाद खेळी खेळली. हे दोन्ही सामने संघाने जिंकले.
आरसीबीविरुद्ध मुंबईचा विजय…
हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, संघाने 29 चेंडू शिल्लक असताना सात विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 131 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात, एमआयने (मुंबई इंडियन्स) अमेलिया करच्या स्फोटक कामगिरीच्या जोरावर सामना जिंकला. 23 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने 24 चेंडूत 40 धावांची नाबाद खेळी करत संघाचा विजय साकार केला.
गुण तालिकेची स्थिती…
मुंबईच्या शानदार विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. संघ सहा गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचवेळी आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. संघाच्या खात्यात चार गुण आहेत आणि त्याचा निव्वळ धावगती -0.015 झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स चार गुण आणि 1.271 निव्वळ धावगतीसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय यूपी वॉरियर्स चार सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गुजरात जायंट्स पाचव्या स्थानावर आहे ज्याने एकही सामना जिंकला नाही.