WPL Live Cricket Score, UPW vs RCB Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगचा 11 वा सामना यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीने यूपीविरुद्ध 20 षटकांत तीन गडी गमावून 198 धावा केल्या. या सामन्यात सलामीला आलेल्या एस मेघना आणि स्मृती मानधना यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. आंध्र प्रदेशच्या एस मेघनाने 21 चेंडूत 28 धावा केल्या. अंजली सरवानीने तिला चामरी अटापट्टूकरवी झेलबाद केले.
Batting carnage in Bengaluru 💥
Captain Smriti Mandhana and Ellyse Perry power @RCBTweets to 198/3
Do we have a high-scoring thriller on the cards ❓
Find out 🔜
Scorecard 💻📱https://t.co/iplAqFh4Yz#TATAWPL | #UPWvRCB pic.twitter.com/tiFhDB2uG5
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 4, 2024
त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेली ॲलिस पेरीही मागे राहिली नाही. ऑरेंज कॅपधारी मानधनासोबत तिने दुसऱ्या विकेटसाठी 95 धावांची मोठी भागीदारी केली. मंधाना 50 चेंडूत 80 धावा करून बाद झाली. तिने खेळीत 10 चौकार अन् 3 षटकार लगावले. मंधाना हिला दिप्ती शर्मानं पूनम खेमनार हिच्याकरवी झेलबाद केलं.
यूपी वॉरियर्सविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली एलिस पेरी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होती. तिने 37 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तिला सोफी एक्लेस्टोनने बाद केले. रिचा घोष 10 चेंडूत 21 धावा करून तर सोफी डिव्हाईन 2 चेंडूत 2 धावा करून नाबाद राहिली. यूपी वॉरियर्स कडून गोलंदाजीत अंजली सरवानी, दिप्ती शर्मा आणि सोफी एक्लेस्टोन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.